कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्टेशन परिसराचा विकास केला जाणार आहे. त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान बाधित होत आहे. हे उद्यान वाचविण्यासाठी लक्ष्मीबाई मारुती ससाने या 85 वर्षीय आजीबाईनी उद्यानातच बेमुदत उपोषणास काल पासून सुरुवात केली आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या स्टेशन परिसर विकासांतर्गत महात्मा फुले चौक ते सुभाष चौक 24 ते 30 मीटर रस्ता रुंदीकरण करण्याचे नियोजीत आहे. यापूर्वी रस्ता रुंदीकरणात हे उद्यान दोन वेळा बाधीत होणार होते. आता पुन्हा ते स्टेशन परिसर विकास प्रकल्पात बाधीत होत आहे. या प्रकरणी शेकडो नागरीकांनी हरकती घेतल्या आहेत. महापालिका उद्यानाची जागा घेणार असल्याने आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले आहेत. मोक्याच्या ठीकाणी आंबेडकर उद्यान आहे.
उद्यान बाधीत होण्यापूर्वीच आंबेडकरी अनुयायी महापालिकेच्या विरोधात एकवटले आहे. त्यात सगळयात मोठा पुढाकार ससाने आजीने घेतल्याने हे बेमुदत उपोषण चर्चेचा विषय ठरले आहे.या संदर्भात स्मार्टसिटी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की उद्यानाचा काही भाग बाधित होणार आहे स्मारकाला धक्का पोहचणार नाही