कल्याण/संघर्ष गांगुर्डे- गेले अनेक दिवस डोंबिवली शीळ रोडवरील लेक शोर परिसरात माकडाने उच्छाद घातला होता. नागरिक मुलांना माकड दाखविण्याच्या हौस खातर त्या माकडाला अन्न आणि फळे देत होती यामुळे ते माकड तेथून जाण्यास तयार नव्हते. तर काही लोकांच्या घरात फळे न मिळाल्याने माकड जबरदस्ती ने घुसून नासधूस करू लागल त्यामुळे स्थानिक नागरिकांनी भितीने वन विभागाच्या टोल फ्री नंबर 1926 यावर संपर्क केला. यानंतर वनपाल मच्छिंद्र जाधव, वनरक्षक रोहित भोई आणि योगेश रिंगने यांनी तेथे प्रथम पाहणी केली तसेच वॉर संस्था प्राणीमित्र विशाल कंथारिया यांच्या मदतीने जखमी माकडाला अन्न आणि फळे देऊ नये ते निघून जाईल त्याला त्रास देऊ नये अशा पद्धतीने नागरिकांमध्ये मध्ये जनजागृती केली.

जखमी माकड स्थानिक रहिवासी फरीदा बरूचा यांच्या फ्लॅट मध्ये शिरून नासधूस करत असल्याची माहिती विशाल यांना मिळाली त्यांनी तत्काळ वनविभागाकडे याबाबत माहिती दिली व त्यांच्या परवानगीने वॉर संस्थेच्या टीमने जखमी माकड सुरक्षितरित्या पकडुन वनविभागाकडे सुपूर्द केले. याप्रसंगी स्थानिक रहिवासी बिनु अलेक्स आणि सतीश बोर यांची खूप मदत मिळाली.
माकड बचाव मोहिमेत संस्थेचे अध्यक्ष योगेश कांबळे, विशाल कंथारिया, स्वप्नील कांबळे, महेश मोरे, कुलदीप चिकणकर यांनी खूप मेहनत घेतली. तसेच प्रेम आहेर, पार्थ पाठारे, सुहास पवार, वनविभागाचे वनपाल मच्छिंद्र जाधव, वनपाल दिलीप भोईर, वनरक्षक योगेश रिंगने व रोहित भोई यांचे मार्गदर्शन लाभले. जखमी माकडाला वैद्यकीय उपचारासाठी पुढे पाठवणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी रघुनाथ चन्ने यांनी सांगितले आहे.