मालेगाव/प्रतिनिधी – एस टी कर्मचऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्येय ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष कपिलभाऊ आहिरे यांच्या नेतत्त्वाखाली वंचित बहुजन आघाडी,नासिकपूर्व,मालेगाव शहर व तालुक्याच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.
अल्प वेतन,वेतन अनियमितता,असुरक्षितता त्याच बरोबर एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी संपावर असलेल्या एसटी कर्मचारी अनेक समस्यांनी ग्रासला आहे.याबाबत रा.प.महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी शासनाकडे वेळोवेळी आपल्यापरीने पाठपुरावा केला आहे.शिवसेना व भाजप सत्तेत असतानाही ह्या कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवल्या नाहीत व सध्या सत्तेत असलेले शिवसेना,राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षही एस टी कर्मचाऱ्यांना न्याय न देता त्यांची पिळवणूक करत आहे.
सरकार व विरोधी पक्षाच्या हलगर्जीपणाला, असंवेदनशील वृतीला त्रासून एस टी कर्मचारी आपले जीवन संपवत आहे तरीही शासन कर्मचाऱ्यांच्या या समस्यांकडे दूर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. ही अत्यंत निंदनीय व लाजिरवाणी बाब असून आम्ही याचा तीव्र शब्दात निषेध करत असून ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपास वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रध्येय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटावे यासाठी आग्रही भूमीका घेतली आहे.या भूमिकेनूरुप ‘वंचित बहुजन आघाडी’ नाशिक(पूर्व),मालेगाव शहर व तालुकाच्यावतीने जाहिर पाठिंबा दिला.
एस टी कर्मचऱ्यांच्या मागणीबाबत राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेवून कर्मचऱ्यांना न्याय द्यावा तसेच राज्यात निलंबित केलेले कर्मचारी पुन्हा कामावर रुजू करण्यासंबंधी आदेश द्यावा अन्यथा वंचित बहुजन आघाडीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येईल,असे आज एसटी कर्मचारी यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करताना आश्वासन देण्यात आले.
यावेळी प्रबुद्ध भारतचे उपसंपादक जितरत्न पटाईत,जिल्हा महासचिव संजय जगताप,जिल्हा मार्गदर्शक युवराज वाघ,राजू धिवरे,मुकेश खैरनार, कैलास लोहार,सुनील आहिरे,शशिकांत पवार,सिद्धार्थ उशिरे,दिलीप सोनवणे,विशाल आहीरे,किशोर निकम,प्रा.राजेंद्र पवार,तुषार वाघ,संतोष बोराळे
कुणाल आहिरे,सतीश मगरे,सिद्धार्थ घोडके,संदीप पवार,गौतम बोरसे,संतोष आहिरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.