नाशिक/प्रतिनिधी – अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुरावा करुनही मागण्या माण्य होत नसल्याने आपल्या ‘महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ’ कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.ग्रामिण महाराष्ट्रातील दळणवळाची मुख्य वाहिणी म्हणून कार्यरत असणारी यंत्रणा म्हणजे ‘महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ’, एस टी म्हटले म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी महत्वाचा विषय ; मात्र या यंत्रणेला सुरळीतपणे कार्यरत ठेवणाऱ्या कर्मचाऱ्याला आज आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे. अल्प वेतन, वेतन अनियमितता, असुरक्षितता यांबरोबरच अनेक समस्यांनी आपला रा.प.म. कर्मचारी ग्रासला आहे. ही दयनियता संपविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. तरीही शासन कर्मचाऱ्यांच्या या समस्यांकडे दूर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
शासनाच्या या असंवेदनशीलतेची परिणती म्हणून कर्मचाऱ्याला आपले जीवन संपविण्याचा मार्ग निवडावा लागत आहे. ही अत्यंत निंदनिय बाब असून शासनाचा या असंवेदनशिलतेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत असून ऐन दिवाळी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपास वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय अँड.बाळासाहेब आंबेडकर यांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटावे यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. या भूमिकेनूरुप आम्ही ‘वंचित बहुजन आघाडी’ बगलाण तालुका च्या वतिने जाहिर पाठिंबा देत आहोत. असे मत वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हा प्रवक्ते प्रा.अमोल बाळासाहेब बच्छाव सर यांनी व्यक्त केले.