मुंबई/प्रतिनिधी – एसटी महामंडळ कामगारांनी पुकारलेल्या संपाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे. अनेक वर्षांपासून कामगारांच्या मागण्या रखडलेल्या आहेत. प्रत्येक वेळी एसटी तोट्यात असल्याचे सांगितले जाते, परंतु महामंडळाच्या बसेस पूर्ण भरून चालतात.त्यामुळे एसटी महामंडळ तोट्यात आहे हे मान्य होण्यासारखं नाही. ते नफ्यातच असले पाहिजे असे आम्ही गृहीत धरतो. महाराष्ट्र शासनाने कामगारांशी बोलून त्यांचा प्रश्न तात्काळ सोडवावा व मागण्या मान्य कराव्यात अशी मागनी सरकार कड़े करत वंचित बहुजन आघाड़ीचा एसटी महामंडळ कामगारांनी पुकारलेल्या संपाला पाठिंबा वंचित बहुजन आघाड़ीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ज़ाहिर केला आहे.