कल्याण/संघर्ष गांगुर्डे – विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना कल्याण क्राईम ब्रांचच्या पथकाने २४ तासांच्या आत गजाआड केले आहे. यातील एक आरोपी हा अल्पवयीन असून एका फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.रात्री १२:३० वाजेच्या दरम्यान तीन अनोळखी इसमांनी एकटयाला गाठुन हाताठोश्याने मारहाण केली त्यातुन फिर्यादी स्वत:ला वाचविण्यासाठी पळुन जात असताना पाठलाग करुन खाली पाडुन त्यांच्या गळयातील सोन्याची चैन जबरीने चोरून नेली. या दाखल गुन्हयाचा गुन्हे शाखा, घटक -३ कल्याण मधील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी अथक प्रयत्न करून घटनास्थळाच्या जवळील व आजुबाजुच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून ग्रांउड लेव्हलला जावुन माहिती काढली व हा गुन्हा २४ तासात उघडकीस आणला आहे.
यामध्ये तीन्ही आरोपींची नावे निष्पन्न करून त्यापैकी साहील राजु गायकवाड रा. डोंबिवली पश्चिम व अल्पवयीन बालक यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. तर या गुन्हयातील एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे.कल्याण क्राईम ब्रांचचे व.पो.नि मनोहर पाटील, सपोनि भुषण दायमा, पोउनि मोहन कळमकर, पोहवा सचिन साळवी, किशोर पाटील, गुरुनाथ जरग, गोरक्ष शेकडे, रमाकांत पाटील, विजेंद्र नवसारे,विनोद चन्ने, राहूल ईशी, महिला पो हवालदार कुभारे, शितल मोरे यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी केली आहे.