कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांसह टिटवाळा आंबिवली परिसरात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे .गेली अनेक वर्षे पाणी समस्या सोडवण्यासाठी तक्रारी निवेदने आंदोलने करून देखील पाणी समस्या निकाली निघत नसल्याने अखेर आज वंचित बहुजन आघाडी तर्फे पालिका मुख्यालयावर हंडा कळशी मोर्चा काढण्यात आला होता .यावेळी मोर्चात मोठ्या प्रमाणात महिला वर्गाने सहभागी घेतला होता. शिष्ट मंडळाने पालिका अधिकाऱ्याची भेट घेतली .पालिकेने या भागाची पाणी समस्या लवकर निकाली काढण्याच आश्वासन दिले .मात्र पाणी समस्या निकाली निघाली तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वंचीत बहुजन आघाडीने पालिका प्रशासनाला दिला आहे.
आंदोलनात सुरेंद्र ठोके, संतोष गायकवाड, अमोल हिवराळे, मिलिंद साळवे, रेखाताई कुरवारे, मिनाताई खराडे , बाजीराव माने, सुनील पगारे यांसह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.
