कल्याण/संघर्ष गांगुर्डे – महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार शुन्य कचरा मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिका परिसरातील हॉटेल्समध्ये दररोज निर्माण होणा-या कच-याचे वर्गिकरण करुन त्याची विल्हेवाट लावण्याकरीता बायोगॅस प्रकल्प हॉटेल्स स्तरावर राबविण्याच्या संकल्पनेस काल घनकचरा विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे यांचे अध्यक्षतेखाली, कल्याणमधील हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष, पदाधिकारी व प्रतिनिधी यांचे समवेत संपन्न झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

हॉटेल्स मधून दररोज निर्माण होणा-या ओल्या कच-यावर हॉटेल स्तरावर विल्हेवाट लावल्यास कच-याची समस्या सुटण्यास मोठी मदत होणार आहे. त्यानुसार हॉटेल असोसिएशने त्यांच्या हॉटेलच्या आवारात छोटे पोर्टेबल बायोगॅस प्रकल्प बसविण्यास संमती दर्शविली असून लवकरच यासंबंधी महापालिकेतर्फे एक कार्यशाळा घेण्यात येणार असून अशा प्रकल्प बसविणा-या संस्था या कार्यशाळेत उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत एकल वापराच्या प्लॉस्टिकचा वापर पूर्णपणे थांबविण्यासाठी महापालिकेस सर्वानुमते सहकार्य करणेबाबत हॉटेल असोसिएशनच्या सदस्यांनी संमती दर्शविली आहे.