टाटा पॉवर उपकेंद्रात तातडीचे दुरुस्ती काम,कल्याण पूर्व व उल्हासनगरच्या काही भागात वीज राहणार बंद

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – नेतीवली येथील 132 केव्ही टाटा पॉवर उपकेंद्रात अत्यंत तातडीचे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या उच्चदाब उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या महावितरणच्या कल्याण पूर्व उपविभाग एक आणि उल्हासनगर तीन उपविभागातील काही भागाची वीज सोमवारी (25 ऑक्टोबर) सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. संबंधित भागातील वीज ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

कल्याण पूर्व एक उपविभागातील 22 केव्ही क्षमतेचे चिंचपाडा, जरीमरी, जाईबाई या तीन फिडर अंतर्गत जरीमरी नगर, तिसगाव, चिंचपाडा, काटेमानवली, हनुमाननगर, एसटी डेपो, विठ्ठलवाडी, खाडेगोलवली आणि कैलासनगर भागाचा वीजपुरवठा बंद राहील. तर उल्हासनगर तीन उप विभागातील चोपडा कोर्ट, अमन टॉकीज, महापालिका परिसर, सपाह गार्डन, शिवाजीनगर, ममतानगर, सचदेवनगर, गौतमनगर, प्रबुद्धनगर, हिराघाट, पवई चौक, विठ्ठलवाडी स्टेशन परिसर, सिंधू युथ सर्कल, उद्योगनगर, उल्हासनगर स्टेशन परिसर, सेक्शन 17, 18, 19, 20, 21, 22 आणि 24, शिवाजी चौक, खन्ना कंपाऊंड भागातील वीजपुरवठा बंद राहील. ओटी सेक्शन, अशोकनगर, आनंदनगर, संतोषनगर, दसरा मैदान, धर्मदास दरबार व वडलगाव भागाचा वीजपुरवठाही बाधित होणार आहे. परंतु ओटी सेक्शन ते वडलगाव या भागांना पर्यायी मार्गाने वीजपुरवठा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. खंडित वीज पुरवठ्याबाबत ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पूर्वकल्पना देण्यात आली आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web