कल्याणात पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांना बेड्या, बार मध्ये रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवने पडले महागात

कल्याण/प्रतिनिधी – रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत ऑर्केस्ट्राबार मध्ये एका पोलिस कर्मचाऱ्यांसह कल्याण डोंबिवली मनपाचे भाजपा माजी उपमहापौर यांच्या भावासह सहा जणांनी गोंधळ घातला यावेळी त्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बार उशिरापर्यंत सुरू ठेवा अशी धमकी बार मॅनेजरला दिली. कल्याणच्या ताल बार मध्ये काल रात्री दहा वाजन्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी बार मॅनेजर यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी सहा जणांना आज पहाटेच्या सुमारास अटक केली.

याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात या पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला .या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे . हरीश्याम कन्हैया, शेखर गणपत सरनोबत मंगल भवरसिंग चौहान, रिकीन केतन गज्जर ,विक्रांत केळकर अशी अटक केलेल्या आरोपींचे नावे आहे . उत्तम लक्ष्मण घोडे हा कल्याण तालुका पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. तर आरोपी शेखर हा भाजपाचे माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांचा लहान भाऊ आहे.. आज या सर्व आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web