भिवंडी/प्रतिनिधी – होप मिरर फाउंडेशन संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त होप मिरर फाउंडेशन स्वयंसेवी संस्थेच्या वतीने भिवंडी तालुक्यातील पडघा येथे राहणारे युवा कवी,पत्रकार मिलिंद सुरेश जाधव यांना नुकतेच ”गोल्डन प्रेस्टीज” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मिलिंद जाधव यांनी साठ्ये महाविद्यालयातून पत्रकारिते मधून पदव्युत्तर पदविका मिळवली असून ते विविध वर्तमानपत्रात बातमीदार म्हणून काम करीत आहेत. ते विविध विषयावर उत्तम कविता लिहून प्रबोधन करीत असतात. त्यांचा सामाजिक तसेच विविध क्षेत्रांमध्ये नेहमीच सहभाग असतो. विविध कवी, साहित्य संमेलनात त्यांचा सहभाग असून विविध विषयांवर प्रबोधनात्मक कविता शाळेत तर विविध ठिकाणी सादर करीत प्रबोधन करीत असतात. एवढंच नव्हे तर, अष्टपैलूव्यक्तिमत्त्वामुळे एक युवा कवी , पत्रकार म्हणून त्यांची ओळख इतरांच्या नजरेतून पाहायला मिळते. अनेक कार्यक्रमात ते सूत्रसंचालनाची धुरा सुध्दा सांभाळत असतात. म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेऊन दिनांक १४ ऑक्टोबर २०२१ रोजी होप मिरर फाउंडेशन संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त होप मिरर फाउंडेशन स्वयंसेवी संस्थेच्या वतीने मिलिंद जाधव यांना सिनेकलाकार अरुण बक्षी, सिनेअभिनेत्री आरती नागपाल होप मिरर फाउंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमजान शेख यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ‘गोल्डन_प्रेस्टीज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील युवकांना विविध क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रेरणा मिळेल.