डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – जगात सर्वात जास्त व्यक्तींना मोतीबिंदू मुळे अंधत्व येतं भारतात देखील हे प्रमाण वाढीस लागलेले असून सरकारने मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रमाण वाढविण्यासाठी सरकारने नियोजन पुर्ण पाउले उचलावीत असे उदगार पदमश्री डॉ. महिपाल सचदेव यांनी आज अनिल आय हाँस्पीटलच्या उदघाटन प्रसंगी काढले.खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते अनिल आय हाँस्पीटलचे उदघाटन आज डोंबिवली येथे करण्यात आले.या उदघाटन प्रसंगी खा.डॉ. श्रीकांत शिंदे, डॉ. उमा हेरुर, डॉ. अनिल हेरुर, डॉ. अनघा हेरुर व्यासपीठावर उपस्थित होते.
डोळ्यातील नैसर्गिक पारदर्शक भिंग अपारदर्शक झाल्यास त्याला मोतीबिंदू असं म्हणतात. अपारदर्शक झालेल्या या भिंगामुळे प्रकाशकिरण डोळ्याच्या आतील दृष्टीपटलापर्यंत पोहचू शकत नाही आणि अशा प्रकारे दृष्टी मंदावते. जगात सर्वात जास्त व्यक्तींना मोतीबिंदूमुळे अंधत्व येतं.भारतात देखील भारतात देखील हे प्रमाण वाढीस लागलेले असून सरकारने मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रमाण वाढविण्यासाठी सरकारने नियोजन पुर्ण पाउले उचलावीत. भारतात दरवर्षी मोतीबिंदू वरील १२ लाख शस्त्रक्रिया पार पडतात. विविध वयोगटातील व्यक्तींचा स्क्रीन टाईम वाढल्याने मायोपिया विकार (निकट दुष्टी दोष) वाढीस लागल्याने डोळ्यांच्या विकारात वाढ होत असल्याने २० मिनिटानंतर डोळ्यांची उघडझाप करणे, उबदार पाण्याने डोळे धुणे असे उपचार करावेत असे डॉ
महिपाल सचदेव यांनी सांगितले.
तर खा.डॉ.शिंदे म्हणाले कि, हे नेत्रविकार विकारावरील फक्त उपचाराचे हास्पीटलनसून नेत्रविकारावरील वैद्यकीय शिक्षण देणारी आधुनिक तंत्रज्ञान युक्त विविध पायाभूत सुविधा उपलब्ध असणारी संस्था निर्माण झाली आहे.वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी जमीन उपलब्ध करण्यासाठी आम्ही सहकार्य करु. हेरुर कुटुंबातील तिसरी पिढी
आरोग्य सेवेत आहे.भविष्यात अनिल आय हाँस्पीटल डोंबिवलीचा मानबिंदू ठरेल.
या कार्यक्रमास डोंबिवलीतील विविध मान्यवर उपस्थित होते. डॉ अनिरुद्ध अनिल हेरुर यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.