कल्याण/संघर्ष गांगुर्डे– केडीएमसी क्षेत्रातील रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न हा सगळीकडेच गाजत होता त्यातच कल्याण ग्रामीण मधील रस्त्यांची अवस्था फार भयानक झाली आहे. या खड्ड्यानमुले नागरीक मेटाकुटीला आले आहेत, त्यातच मागील काही दिवस 27 गावाच्या अंतर्गत रस्त्यासाठी मा. नगरसेवक कुणाल पाटील पाठपुरावा करत होते एकंदरीत पाहता 27 गावाच्या रस्त्याची अवस्था फार बिकट झाली आहे .त्यामुळे नागरिकांना खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खराब रस्त्यांमुळे अनेक अपघात घडत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या साठी कुणाल पाटील सतत प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते. त्याच बरोबर वेळ आली तेव्हा त्यांनी आंदोलनही केले आहे .आणि त्यांच्याच आंदोलनाची दखल प्रशासनेने घेतली असून कल्याण ग्रामीण मधील प्रथम द्रारली गावाच्या कामाची सुरुवात झाली आहे.व इतरही रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे कुणाल पाटील यांनी प्रशासनाचे अभिनंदन करत आभार मानले आहे. त्यांनी या कामाची पाहणी केली.या वेळी चेतन पाटील,पंडित पाटील,मुरलीधर राणे,सुनिल चीकनकर,हरदीप पाटील व गावकरी उपस्थित होते