डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सुविधायुक्त असलेल्या डोंबिवलीतील डॉ अनघा हेरूर यांच्या अद्ययावत सुविधांनी सज्ज असे नवीन नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन रविवार १० ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पद्मश्री पुरस्कारप्राप्त वैद्यकीय माजी संचालक प्रा. डॉ. टी. पी. तात्यासाहेब लहाने आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त अध्यक्ष आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, महाराष्ट्र प्रा. डॉ. महिपाल एस सचदेव व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
वाढत्या मधुमेहाचा परिणाम डोळ्यावर होत असून डोळ्याच्या विकारात तसेच स्क्रीन टाईम वाढल्यामुळे लहानापासून वृद्धापर्यत सर्व प्रकारच्या नागरिकांमध्ये डोळ्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत. यामुळे डोळ्याच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाची संख्या कमालीची वाढली असून मधुमेह असलेल्या रुग्णावर ऑपरेशन करून शस्त्रक्रिया केली गेल्यास त्यांची दृष्टी जाण्याची शक्यता जास्त असते. यामुळेच अशा रुग्णावर लेझर तंत्रज्ञानाद्वारे शस्त्रक्रिया करत या रुग्णाची दृष्टी अबाधित ठेवण्यात यश आले असून ८५ टक्के नागरिकांना यामुळे फायदा झाल्याचे डॉ. अनघा हेरूर यांनी पत्रकरांना सांगितले.