भिवंडी/प्रतिनिधी – अनलॉक काळात भिवंडीत घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असतांनाच नारपोली पोलिसांनी घरफोडीतील ५ गुन्हे उघडकीस आणून आतापर्यत ८ सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळ्यात यश आले असून या चोरट्याकडून तब्बल ६३ लाख ९३ हजरांचा मुद्देमालही हस्तगत केल्याची माहिती भिवंडीचे पोलीस उपाआयुक्त योगेश चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.
पहिल्या गुन्हयात फिर्यादी आजाद कुमार धरमचंद देरासरीया , (वय ५९ वर्षे , रा घाटकोपर ) यांनी २६ ऑगस्ट नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या पूर्णा गावात असलेल्या जय भारत इम्पेक्स या कंपनीचे गोडाऊन फोडून चोरटयांनी गोडावूनमध्ये ठेवलेला कॉपर व झिंक धातुचा माल , प्रिटर, व डिव्हीआर मशीन अज्ञात चोरट्यानी लंपास केल्याची तक्रार दिली होती. या गुन्ह्याचा नारपोली पोलिसांनी तपास करून आरोपी दिवाकर ब्रिजकिशोर जैयस्वाल , (वय ४० वर्षे , रा. ठाणे) इम्रान रहेमान शेख ( वय ३० वर्षे , रा. मलाड ) मोहम्मद सोऐब अब्दुल मेमन उर्फ सोनु (वय ३४ वर्षे, रा. मलाड ) या त्रिकुटाला अटक केली. अटक आरोपींकडून गुन्हयातील चोरी केलेले कॉपर व झिंक धातु असे एकुण १० लाख २३ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल व चोरी केलेला माल वाहुन नेण्याकरीता वापरलेले दोन वाहने अशी एकुण १४, लाख ७३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल नारपोली पोलिसांनी हस्तगत केला आहे.
दुसऱ्या व तिसऱ्या गुन्ह्यात आरोपी मजिबुर रेहमान अब्दुल रेहमान इद्रीसी , (वय २४ वर्षे , रा. पटेल कम्पाउंड ) याने गोडाऊन फोडून प्लॉस्ट अँड पोलिप्लेक्स प्रॉडक्टस या कंपनीतून राजलक्ष्मी काँम्प्लेक्स काल्हेर येथून पीव्हीसी रोल व आयकॉन बॅग ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. त्याच बरोबर ओरिजनल जॅक अँड डिकलेन या कंपणीत घरफोडी करून १६ लाख १८ हजार ६५० रुपयांचे एकुण १ हजार ३५० टी शर्ट ची चोरी केली होती. हा सर्व मुद्देमाल आरोपिकडून नारपोली पोलिसांनी जप्त केला आऊन आरोपीस अटक केली आहे.
चौथ्या गुन्ह्यात सुशील भगचंद्र जैन , ( वय .४१ वर्षे) यांचे कोपर गावात होजेअरी फॅब्रीक कपडयाचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये ठेवलेला एकुण १८ लाख ८६ हजार रूपयाचा होजेअरी फॅब्रीक कपडयाचा माल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याची तक्रार नारपोली पोलीस ठाण्यात दिली होती. या गुन्हयाच्या तपासादरम्यान तांत्रीक व गुप्त माहीतीदारा मार्फत आरोपी मुमताज अहमद इनायत अली शाह (वय ४३ वर्षे रा , गोवडी मुंबई ), अख्तर अब्दुल जब्बार खान , (वय .४३ वर्षे रा. गोवडी , मुंबई यांना अटक केली आहे. आरोपीकडून १४ लाख ११ हजार -किमतीचे कपड्याचे रोल आणि गुन्हयात वापरलेले दोन वाहने असे एकुण १६ लाख ११ हजार रुपयांचा मुद्दे माल हस्तगत केलेला आहे .
पाचव्या गुन्ह्यात कृष्णकुमार रामप्रसाद यादव ,( वय -३७ वर्षे , दापोडा ) , यांनी नारपोली पोलीस ठाण्यात २४ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२१ रोजीच्या दरम्यान दापोडे गावातील सी.एम.सी मेटल प्रा . लि . या कंपनीच्या गोडावुनमधून १७ लाख ५० हजार रुपये किंमतीचे २३०० किलो वजनाचे कॉपर ट्यूब अज्ञात चोरटयाने लंपास केले. या चोरीचा तपास करून गुन्हयामधील आरोपी अमरीश शिवाजी जाधव , (वय ४७ वर्षे , रा गुंदवली) , शिला नरेंद्र मिश्रा , (वय ४० वर्षे , रा. गुदवली) या दोघांना अटक करून त्यांच्याकडून आतापर्यत १३ लाख ५१,हजार रुपयांचे कॉपर हस्तगत केले. तसेच गुन्हयात वापरलेले वाहन असा एकुण १५, लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केली आहे .
असे एकूण पाच गुन्हयांमध्ये एकुण ६३ लाख ९३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे, पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) रविंद्र वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी स.पो नि. चेतन पाटील, पोउपनिरी रोहन शेलार यांच्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.