भिवंडी प्रतिनिधी – भिवंडी तहसीलदार कार्यालय जिल्हा ठाणे यांच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोफत संगणकीकृत डिजीटल स्वाक्षरीकृत सातबारा वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ दिनांक ०२ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११:०० वा भिवंडी तालुक्यातील ग्रामसचिवालय कार्यालय पडघा येथे करण्यात आला. यावेळी महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. शेतकऱ्यांना संगणकीकृत डिजीटल स्वाक्षरीकृत सातबारा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला चागला प्रतिसाद लोकप्रतिनिधींनी नोंदवला आहे. शेतकऱ्याच्या ज्या अडीअडचणी आहेत. त्या सातबाराशी निगडित आहेत. शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा सोपवायचा आहे. तहसीलदारांच्या स्वाक्षरीने १००% सातबारा पोहचविणे या मूळ उद्देश आहे. असे यावेळी प्रांत अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी बोलताना सांगितले.
महाराष्ट्र शासनाने , महसूल विभागाने १ ऑगस्ट २०२१ पासून जो पूर्वीचा सातबारा होता. आणि जो आताचा सातबारा आहे. त्यात खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेल्या आहे. या बद्दलची माहिती देण्यात आली तर महसूल विभागा मार्फत घरपोच सातबारा शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर भिवंडी तालुक्यात ९६% संगणकीकृत डिजीटल स्वाक्षरीकृत सातबारे झालेले आहेत. असे तहसीलदार अधिक पाटील यांनी बोलताना सांगितले. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निवारण करण्यात आले. यावेळी प्रांत अधिकारी बाळासाहेब वाकचौरे, भिवंडी तहसीलदार अधिक पाटील,
भिवंडी नायब तहसिलदार महेश चौधरी, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती श्रेया गायकर, पंचायत समिती सदस्य गुरूनाथ जाधव, उद्योगपती पंडित पाटील, पडघा सोसायटीचे सभापती श्रीकांत गायकर, सरपंच अमोल बिडवी ,उपसरपंच अभिषेक नागावेकर, पडघा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश कटके, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण गोष्टे, पडघा भातगिरणी उपसभापती मनोहर ठाकरे, पडघा मंडळ अधिकारी संतोष आगीवले, पडघा विभागातील तलाठी, महसुल विभागाचे कर्मचारी,पडघा विभागातील शेतकरी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गायकवाड यांनी केले.