कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोबिवली महानगरपालिका अधिकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची आकरावी सर्वसाधारण सभा दिनाक दि २९ सप्टेंबर २०२१ रोजी महापालिका भवन स्थायी समिती सभागृहात पार पडली. या सभेचे अध्यक्ष चंद्रकात पोळ होते.तर प्रमुख पाहूणे मुख्यलेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे व संस्थेचे मार्गदर्शक माजी महापौर रमेशजी जाधव पतसंस्थेचे सचिव विलास गायकवाड संस्थेच्या खजिनदार सौ कल्पनाताई खरात व संचालक मंडल संस्थेचे सभासद उपस्थित होते.
जे सभासद पालिका कर्मचारी कोव्हीड मुळे मृत्यू पावले आहेत त्या पालिका कर्मचाऱ्यांच्या वारसाना प्रत्येकी दोन लाखाचा धनादेश पतसंस्थेकडून देण्यात आले. हे धनादेश माजी महापौर रमेश जाधव व मुख्यलेखा व वित्त अधिकारी उबाळे संस्थेचे चेअरमन चंद्रकात पोळ संस्थेच्या कोषाध्यक्षा सौ.कल्पनाताई खरात यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. श्री. मंगल भिमराव साळवे आणि श्री. भारती मंगेश जाधव यांनी हे धनादेश स्वीकारले.
कल्याण डोबिवली महानगरपालिका अधिकारी कर्मचारी सहकारी पतसंस्था नेहमीच सहकार तत्वावर अनेक योजना राबवत आहे, या मध्ये संस्थेचे सभासद मरण पावल्यास अंत्यविधी खर्चासाठी दोन हजार रूपये, सेवानिवृती कार्यक्रमासाठी एक हजार रूपये अशा योजना, तसेच कामगाराच्या आडी आडचणीना पत पुरवठा करत आहे.या कार्यक्रमामध्ये श्री. मंगल साळवे याच्याकडून संस्थेच्या सभासद कल्याणनिधी मध्ये दहा हजार रूपयाचा धनादेश देण्यात आला. या स्तुत्ये उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.संस्थेचे संचालक समाधान मोरे यानी आभार मानले.