डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – आयपीएल च्या क्रिकेट मॅचवर सट्टा घेणाऱ्या 3 बुकींना डोंबिवली लोढा पलावा येथे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. लोढा पलावाच्या कॅसारिओ गोल्ड सोसायटीत काही इसम आयपीएलवर बेकायदेशीररित्या सट्टा घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आयपीएल मधील सनराईज हैद्राबाद आणि राजस्थान रॉयल्स संघाच्या क्रिकेट मॅचवर हा सट्टा घेण्यात येत होता. त्याचवेळी पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला या छाप्या दरम्यान त्यांच्याकडून लॅपटॉप, सिमकार्ड असणारे 6 आणि सिमकार्ड नसलेले 17 मोबाईलसह 7 लाख 65 हजरांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.
त्याच बरोबर रितेश कुवरप्रकाश श्रीवास्तव, कुणाल बबनराव दापोडकर आणि निखिल फुलचंद चौरसिया या तिघा बुकीं ऑपरेटरला ताब्यात घेतले आहे त्यांच्यावर मुंबई जुगार कायदा तसेच भादविक ४२०,४६८,३४,२०१ नूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त सचिन बाबासाहेब गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे, वडणे, पोलीस हवालदार संजय पाटील, देवरे, पोलीस शिपाई ऋषीकेश भालेराव, बडगुजर, पोलीस नाईक लोखंडे, कुरणे आदींच्या पथकाने केली.पुढील तपास पोलिस करत आहेत.