बीड/ प्रतिनिधी – बीड च्या दौऱ्यावर ओबीचीचे नेते मंत्री विजय वडेट्टीवार हे आले होते. बीड मध्ये आयोजित ओबीचीच्या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी ते आले होते त्या वेळी ते बोलत होते. तेव्हा ते म्हणाले की महाविकास आघाडी सरकार कोसळेल म्हणून भाजपाने देव पाण्यात बुडवून ठेवलेत पण तेच पाण्यात बुडणार आहेत. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपच्या सी टी रवी यांच्यावर पालटवार केला, ते म्हणाले कि आमच्या कडे जोतिषी नाही भाजप कडे जोतिषी आहेत. हवामान खात्यासारखे त्यांचे जोतिष आहे जे कधीच सत्य होत नाही.महाविकास आघाडी सरकार लवकरच कोसळेल असं वक्तव्य भाजपचे सी टी रवी यांनी केलं आहे. याला प्रतिउत्तर देत विजय वडेट्टीवार चांगलेच बरसले. सरकार कोसळेल बोलता बोलता दोन वर्ष सरकारने पूर्ण केले आहे.आणि पुढेही महाविकास सरकारचे सरकार टिकेल.