धक्कादायक; पत्नीसह २ वर्षीय चिमुकलीची निर्दयीपणे हत्या करत पतीची गळफास घेऊन आत्महत्या

बीड/प्रतिनिधी– पत्नी व दोन वर्षीय चिमुकल्या मुलीची हत्या करून, स्वतःहा गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडच्या परळी तालुक्यातील सिरसाळा गावात उघडकीस आलीय. गावात मोहा रोड परिसरात रात्री साडेनऊ ते 10 च्या दरम्यान ही घटना घडलीय. तर घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गावातील अल्लाबकश शेख याने आपली पत्नी व 2 वर्षीय मुलची गळा चिरून हत्या केल्याचा प्रकार प्राथमिक माहितीतून समोर दिसून आला आहे. माय लेकीला मारून त्याने स्वतःहा देखील गळफास घेऊन आत्महत्या केलीय. दरम्यान अल्लाबकश याने असं का केलं ? याचा तपास पोलीस करत आहेत असून तिन्ही मृतदेह अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.दरम्यान या दुर्दैवी व क्रूर घटनेने सिरसाळा परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web