अतिवृष्टीने अंबाजोगाई तालुक्यात झालेल्या नुकसानीची पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली पाहणी

बीड/प्रतिनिधी– बीड जिल्ह्यातील सततच्या पावसाचे सत्र कमी होताना दिसत नाही, त्यातच अंबाजोगाई तालुक्यातील मांजरा काठच्या परिसरात झालेल्या अतिवृष्टीने या भागातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या भागातील गावांना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेटी देत झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली.

यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीची संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधत माहिती घेतली. या परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार व दिलासा देण्याबरोबरच संयुक्त पंचनाम्याची प्रक्रिया देखील आता अंतिम टप्प्यात आहे. पुन्हा पुन्हा पाऊस आल्याने आकडेवारी बदलत आहेत, मात्र नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यास मदत दिली जाईल या दृष्टीने संबंधित अधिकारी व विमा कंपनी यांना सूचना केलेल्या आहेत, असे यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.

या दौऱ्यात त्यांनी राडी, राडी तांडा, तडोळा, धानोरा (बु.), पाटोदा (म.) आदी गावांना भेटी देऊन सोयाबीन, कापूस, ऊस आदी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. पाटोदा येथील तुटलेला पूल तातडीने दुरुस्त करण्याबाबत मंत्री मुंडेंनी संबंधितांना निर्देश दिले. तडोळा ता. अंबाजोगाई येथील राम कदम यांचा मांजरा नदीच्या पात्रात शुक्रवारी वाहून जाऊन मृत्यू मुखी पडले होते. आज सकाळी एन डी आर एफच्या पथकाला त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले होते. ना. धनंजय मुंडे यांनी कदम कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.

घरातील एकमेव करता पुरुष गेल्याने त्यांच्या पत्नी श्रीमती ठकूबाई कदम यांच्यावर मुला-बाळांची जबाबदारी आली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून प्रशासनाने गतिमान प्रक्रिया राबवत राज्य सरकारच्या वतीने कदम कुटुंबीयांना 4 लाख रुपये मदतीचा धनादेश अवघ्या पाच तासात आणला असून, मंत्री मुंडे यांच्या उपस्थितीत कदम कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला.

यावेळी मंत्री मुंडे यांच्यासह जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंगाबप्पा सोनवणे, मा.आ. पृथ्वीराज साठे, ज्येष्ठ नेते दत्ता आबा पाटील, रा.कॉ.परळी मतदार संघ अध्यक्ष गोविंदराव देशमुख, राजेश्वर आबा चव्हाण, शिवाजी सिरसाट, बबनभैय्या लोमटे, विलासबापू मोरे, आबा पांडे, प्रशांत जगताप, अरुण जगताप, ताराचंद शिंदे, रणजितचाचा लोमटे, सुधाकर शिनगारे, सत्यजित सिरसाट, बाळासाहेब देशमुख, बालासाहेब गंगणे, सतीश गंगणे, भागवत गंगणे, राडीचे सरपंच दत्तात्रय गंगणे, मनोज गंगणे, तडोळ्याचे सरपंच नागनाथ अडसूळ, वसंतराव कदम, कमलाकर कदम, महादेव कदम, एकनाथ कातळे, दत्ता जगदाळे, बाळासाहेब बिराजदार, शिवाजी कांबळे, अक्षय कदम, दीपक थोरात यांसह तहसलीदार विपीन पाटील, तालुका कृषी अधिकारी श्री. बर्वे, महावितरण चे श्री. देशपांडे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. जगताप,

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web