डोंबिवली/प्रतिनिधी -डोंबिवलीत 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे डोंबिवली हादरली आहे . याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दोन अल्पवयीन मुलांसह 23 जणांना ताब्यात घेतलं आहे .यामध्ये आरोपिमध्ये राजकीय पक्षातील पदाधिकार्यांची मुलं असल्याची देखील प्राथमिक माहिती आहे .प्रियकराने जानेवारी महिन्यात पीडित मुलिवर बलात्कार करत व्हिडियो काढला .या व्हिडिओच्या आधारे पीडित अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर 29 जणांनी बलात्कार केल्याची सध्या समोर आली आहे .या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून आणखी काही आरोपींची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.
त्यानंतर अध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकुर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी,वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी, व सम्यक विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी हे मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले. निवेदन देऊन अत्याचार करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी लावून धरली .याप्रकरणा संदर्भातील महिला पोलीस अधिकारी सौ.सोनाली ढोले यांना भेटून या प्रकरणा संबंधित माहिती घेतली. एकूण ३३ आरोपी आहेत त्यामध्ये २४ आरोपी अटक असून २ आरोपी अल्पवयीन आहेत व बाकीचे आरोपीचा शोध सुरु आहे त्यांना सुद्धा लवकरात लवकर अटक करण्यात येईल अशी माहिती तपास अधिकारी यांनी दिली, तसेच कलम 376 व पोस्को दरम्यान गुन्हा दाखल केलेला आहे.आरोपींना ७ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. अशी माहिती पोलीस अधिकारी यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना दिली.
