बाप्पाची बैलगाडीवरून मिरवणूक काढत पेट्रोल डिझेल दरवाढीचा केला निषेध

कल्याण/प्रतिनिधी – दररोज वाढणाऱ्या इंधनांच्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असतांनाच याच इंधन दरवाढीचा फटका गणपती बाप्पाला देखील बसला आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस प्रचंड महाग झाले असल्याने कल्याणमधील विजय तरुण मंडळाच्या गणपती बाप्पाची विसर्जनाची मिरवणूक बैलगाडीतून काढण्यात आली. या केंद्र सरकारला महागाई कमी करण्याची सद्बुद्धी दे अशी विंनती यावेळी गणरायाकडे करण्यात आली. यावेळी इंधन दरवाढी विरोधात केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. सामान्य जनतेला या दर वाढीमुळे किती त्रास होत आहे.हे यातून गणेश मंडळाने दाखून दिले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web