कल्याण वनविभागाची मोठी कारवाई, प्रतिबंधित काळा समुद्र शैवाल व घोरपडीचे अवयव जप्त

 कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याणमधील एका महिला वास्तू सल्लागाराच्या कार्यालयात वन्यजीव गुन्हे अन्वेषण ब्युरो आणि वन विभाग कल्याण शाखेने छापा टाकत  250 प्रतिबंधित असलेले इंद्रजाल (काळा समुद्री शैवाळ) आणि 80 जोडी घोरपडीचे अवयव जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी वनविभागाकडून वास्तू सल्लागार गीता जाखोटिया या महिलेसह त्याच्या कार्यालयातील कर्मचारी नवनाथ घुगे आणि अक्षय देशमुख अशा तिघांना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे .या वस्तू इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यालयात का आणल्या याचा तपास सुरु असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यानी सांगितले.

कल्याण पश्चिमेकडील संतोषी माता रोडवरील मॅक्सी ग्राउंडसमोरील इमारतीत असलेल्या एका महिला वास्तू सल्लागाराच्या कार्यालयात दुर्मिळ व बाळगण्यास बंदी असलेली काळ्या समुद्र शैवाळाचे तुकडे व घोरपडीचे अवयव असल्याची माहिती वन्यजीव गुन्हे अन्वेषण ब्युरोला माहिती मिळाली होती .या माहितीच्या आधारे वन्यजीव गुन्हे अन्वेषण ब्युरो विभागीय उपसंचालक योगेश वारकड, गजेंद्र हिरे, आणि वन विभागाचे आर एन चन्ने आणि त्यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी धाड टाकली असता या कार्यालयात प्रतिबंधित अशा 250 काळ्या समुद्र शैवाळाचे तुकडे आणि 80 जोड्या घोरपडीचे अवयव आढळून आले.  या पथकाने मुद्देमालासह तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीसकोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून या वस्तूचा साठा करण्यास किंवा या वस्तू जवळ बाळगण्यास कायद्याने बंदी असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणावर या वस्तूचा साठा का करण्यात आला होता याची चौकशी सुरु असल्याचे वनविभागाचे अधिकारी चन्ने यांनी सांगितले.दरम्यान इंद्रजाल आणि घोरपडीचे अवयव घरात, कार्यालयात, दुकानात ठेवल्यास सुखशांती आरोग्य आणि लक्ष्मी घरात नांदते, या अंधश्रद्धेपोटी या वस्तू बाळगल्या जात असून काळी जादू करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. तर  आयुर्वेदिक औषधा मध्ये देखील या वस्तू वापरल्या जातात मात्र या वस्तू जवळ बाळगण्यास किंवा त्यांची विक्री करण्यास वन्यजीव कायदा 1972 अन्वये मज्जाव करण्यात आला आहे.पुढील तपास अधिकारी करत आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web