कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी अनधिकृत बांधकामांविरोधात दंड थोपटले असून यापुढे अनधिकृत बांधकामांना नळजोडणी मिळणार नसून अनधिकृत बांधकामांची यादी महावितरणला देखील देण्यात आली आहे तसेच या बांधकामांना वीज पुरवठा देऊ नये अशी मागणी महापालिकेच्या वतीने महावितरणकडे करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
केडीएमसीने बेकायदा बांधकामांबाबत कारवाई आणखीनच तीव्र केली आहे. याबाबत बोलताना महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी अनधिकृत बांधकामाना कोणत्याही परिस्थितीत नळ जोडणीची परवानगी देणार नाही आणि दिली असल्यास ती तोडू. अनधिकृत इमारतींना विजेचे कनेक्शन देऊ नये अशी मागणी महावितरणकडे पत्राद्वारे केली आहे. महावितरणला अनधिकृत बांधकामांची यादी देखील देण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.