महावितरणच्या अभियंत्यांनी जपली सामाजिक बांधिलकी, अभियंता दिनानिमित्त ५२ अभियंत्यांचे रक्तदान

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – महावितरणच्या कल्याण परिमंडलात अभियंता दिनानिमित्त बुधवारी आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोशिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या या शिबिरात ५२ अभियंत्यांनी रक्तदान करत सामाजिक वसा जोपासला.

मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या हस्ते भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिराला प्रारंभ झाला. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत आयोजित केलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी कल्याण एक मंडलचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील, कल्याण दोन मंडलचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, स्थापत्य विभागाचे अधीक्षक अभियंता विजय मोरे, कार्यकारी अभियंता (प्रशासन) अनिल महाजन, सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोशिएशनचे प्रादेशिक सचिव श्रीनिवास बोबडे, सहसचिव रवींद्र नाहीदे यांच्यासह पदाधिकारी व अभियंते उपस्थित होते.

राज्यातील रक्ताची टंचाई लक्षात घेऊन संघटनेने अभियंता दिनानिमित्त रक्तदान शिबिराचा विधायक उपक्रम राबवला. या विधायक उपक्रमाला ऊत्स्फुर्त प्रतिसाद देत संघटनेचे बोबडे, नाहिदे हे प्रमुख पदाधिकारी, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर यांच्यासह ५२ जणांनी या शिबिरात रक्तदान केले. या शिबिरासाठी डोंबिवली येथील प्लाझ्मा रक्तपेढीचे सहकार्य लाभले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web