कल्याण/प्रतिनिधी – कल्याण मधील रामबाग परिसरात विजय तरुण मंडळातर्फे दरवर्षी गणेशोत्सव मोठया भक्तीभावात साजरा केला जातो .गणेशोत्सव दरम्यान समाजातील गरजवंतांना मदतीचा हात देत हे मंडळ सामाजिक बांधिलकी जपत असते .गेल्या काही वर्षात मंडळातर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना ,रुग्णांना ,शहीदांच्या कुटुंबाला ,दिव्यांग विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात आला आहे .यंदा उत्सवाचे 58 वे वर्ष आहे .गेली दोन वर्षे कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करण्यात मर्यादा आल्या आहेत .विजय तरुण मंडळातर्फे यंदा अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा केलाय .
गणेशोत्सवा साठी मंडप ,सजावट ,मिरवणूक ,वाद्य ,यावर खर्च न करता मंदिरात मूर्तीची स्थापना केलीये .गणेशोत्सवाचा निधी एका तरुणीच्या मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी दिलाय .मयुरी सूर्यवंशी ही 21 वर्षीय तरुणी ब्रेन ट्युमर आजाराने त्रस्त आहे .या तरुनीच्या उपचारासाठी 1 लाख रुपयांचा धनादेश तिच्या आईला आज सुपूर्द केला आहे .लहानपणीच मयुरीच्या वडिलांचे निधन झाले ,आई घरकाम करून उदरनिर्वाह करते तिने मयुरीला उच्च शिक्षण दिले मयूरी ने एमबीए केलं आहे मात्र सहा महिन्यापूर्वी तिला ब्रेन ट्युमर या आजाराची लागण झाल्याचे निदान झाले . सहा महिन्यापासून तीच्यावर उपचार सुरू आहेत .मदत मिळाल्यानंतर तिच्या आईचे अश्रू अनावर झाले तिने मंडळाचे आभार मानले .