गणेशोत्सवात ठाकुर्लीच्या बालाजी आंगण सोसायटीने उभारला ऑलिम्पिकचा देखावा

डोंबिवली/प्रतिनिधी – मागील दीड वर्षांपासून कोरोनामुळे सगळेच घरात कोंडले गेले आहेत. लोकडाऊन आणि घातले जाणारे निर्बध यामुळे सर्वत्र नकारात्मक वातावरण तयार झाले होते. मात्र याच दरम्यान झालेल्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारतीय खेळाडूंनी आकर्षक खेळ करत पदकाना गवसणी घातल्याने नकारात्मक वातावरण बदलून सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत झाली आहे.

हाच धागा पकडुन ठाकुर्लीतील बालाजी आंगण सोसायटीने ऑलिम्पिकचा देखावा मांडला आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण देखावा कागद व पुठ्ठ्या पासून तयार केला असून गणेश मूर्ती देखील मातीची आहे एकूणच सलग सहा वर्षे या सोसायटीने पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचा पायंडाच पाडलाय.आजवर भारतात फक्त क्रिकेटला जास्त महत्त्व दिले गेले असून इतर खेळांकडे त्यामानाने दुर्लक्ष झाले आहे .या खेळाला प्रोत्साहन देत खेळाडूंचा उत्साह वाढविणे गरजेचे आहे. क्रिकेटव्यतिरिक्त खेळातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्या दर्जाच्या अकॅडमी तयार करण्याची गरज आहे ज्यामुळे महाराष्ट्रातील खेळाडूंनाही एक व्यासपीठ मिळेल आणि महाराष्ट्राकडे ऑलम्पिक ची पदके येऊ शकतील हे दाखवून देण्याचा या देखाव्यातून या तरुणांनी प्रयत्न केला आहे

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web