महाबँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण केंद्र,ठाणे यांच्या तर्फे मोफत फोटोग्राफी प्रशिक्षण

ठाणे/संघर्ष गांगुर्डे – महाबँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण केंद्र ,ठाणे हि केंद्र सरकार तसेच बँक ऑफ महाराष्ट्र पुरस्कृत संस्था आहे सदर संस्थेतर्फे तर्फे फोटोग्राफी हे व्यावसायिक प्रशिक्षण दि. २२/०९/२०२१ ते २१/१०/२०२१ या ३० दिवसाचा कालावधीत आहे .प्रशिक्षणाची वेळ सकाळी १०.०० ते सायं ५.०० पर्येंत असेल.या प्रशिक्षणा मध्ये जेवणाची सोय मोफत असेल. सदर प्रशिक्षणात कौशल्याच्या प्रशिक्षाणा सोबत साईट विजीट , बाजार सर्वेक्षण ,संवाद कौशल्य , बॅंकेचे व्यवहार,कर्ज प्रस्ताव बनविणे यांचे उत्तम मार्गदर्शन मिळेलबेरोजगारीवर मात करून स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असणार्या ठाणे जिल्ह्याच्या १८ ते ४५ वयातील व्यक्तींनी सदर प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा .

अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर अथवा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करा :

महाबँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण केंद्र ,

पत्ता- जिजाऊ विक्री केंद्र ,

 पहिला माळा ,

 जिल्हा परिषद आवार ,

 मेन बाजार रोड ,

 ठाणे (प) .

 दूरध्वनी क्रमांक: 9323924391

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web