कल्याण/ प्रतिनिधी – रात्री 11 वाजता लोकलची वाट पाहत फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशाला थेट तलवारीचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकावर घडली. प्रवाशाने आरडा ओरड केल्याने फलाटावर तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत अटक केली.निखिल वैरागर असे या चोरट्याच नाव असून त्याने या आधी किती प्रवाशांना अशा प्रकारे लुटले याचा शोध रेल्वे पोलीस घेत आहे . वारंवार घडणाऱ्या अशा घटनामुळे प्रवाशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आंबिवली येथे राहणारा तरुण हा 29 ऑगस्ट रोजी 11 वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकावर 2 नंबर फलाटावर पुलाच्या खाली लोकलची वाट पाहत उभा होता. इतक्यात पुलावरून त्याच्या जवळ आलेल्या निखिल वैरागर या 21 वर्षीय तरुणाने आपल्या शर्टाच्या आत लपवून ठेवलेली तलवार काढत या तलवारीचा धाक दाखवत जवळ असलेले पैसे आणि मोबाईल दे नाहीतर ठार मारण्याची धमकी दिली.मात्र त्याच्या सुदैवाने लोकलच्या प्रतीक्षेत असलेला आणखी एक प्रवासी तलवार बघून पुढे सरसावला त्यांनी आरडा ओरड केल्याने ड्युटीवर असलेल्या पोलिसांच लक्ष गेलं त्यांनी तत्काळ घटना स्थळी घेत निखील याला ताब्यात घेतलं कल्याण जी आर पी मध्ये निखीलविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे