सचिन वाझे भिवंडीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल

भिवंडी/प्रतिनिधी – मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे याची प्रकृती बिघडल्याने त्याला भिवंडीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी मंगळवारी दाखल करण्यात आले आहे . विशेष म्हणजे मनसुख हिरेन हत्याकांडा बरोबरच मुकेश अंबानी यांच्या अंटालिया घराजवळ जिलेटीन ठेवल्याने सचिन वाझे देशभर चर्चेत आला आहे . या प्रकरणात त्याला अटक केल्या नंतर त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली होती . कारागृहात वाझे यास हृदय विकाराचा त्रास झाल्याने वाझे याच्या निकटवर्तीयांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी मागितली होती . त्यांनतर त्यास भिवंडीतील एका खासगी रुग्णालयात मंगळवारी दुपारी दाखल करण्यात आले आहे.            

विशेष म्हणजे एखाद्या गंभीर प्रकरणातल्या आरोपीवर भिवंडीतील खासगी रुग्णालयात नेमके का दाखल करण्यात आले , हे सध्या तरी न उलगडणारे कोडे आहे. महत्वाचे म्हणजे सचिन वाझे अटकेपूर्वी पोलीस अधिकारी असल्याने त्याचा ठाण्यात चांगलाच दबदबा आहे. त्यातच भिवंडीतील ज्या खासगी रुग्णालयात सचिन वाझे यास दाखल केले आहे तेथून ठाणे शहर अगदी हाकेच्या म्हणजेच सधारणतः तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे . त्यामुळे सचिन वाझे यास खरोखरच उपचारासाठी भिवंडीसारख्या ठिकाणी दाखल केले आहे किंवा त्यामागे काहीतरी राजकारण असावे अशी चर्चा सध्या शहरात रंगू लागली आहे . सचिन वाझे यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना भिवंडीतील खासगी रुग्णालयात मंगळवारी ( आज ) चार वाजता दाखल करण्यात आले आहे अशी माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे. 

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web