राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त बिर्ला महाविदयालयातर्फे आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. मेजर ध्यानचंद यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी भारत सरकार क्रीडा दिनाचे आयोजन करते. बिर्ला महाविद्यालयाच्या वतीने आयोजित या परिसंवादात, भारत आणि इतर दहा देशांतील ४८ क्रीडाप्रेमी आणि क्रीडा संशोधकांनी आपले शोध निबंध सादर केले. या सेमिनारमध्ये ३५० हून अधिक लोकांनी सहभाग घेतला.

बिर्ला महाविदयालय यंदा आपल्या स्थापनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे,  तसेच महाविद्यालयाचे संस्थापक बसंतकुमार बिर्ला यांचे जन्मशताब्दी वर्ष देखील साजरे केले जात आहे. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी, नवी दिल्लीचे सहसचिव डॉ.बलजितसिंह सेखोन, या सेमिनारचे प्रमुख पाहुणे होते आणि सुबोध तिवारी, सीईओ, कैवल्यधामा योग केंद्राचे बीज वक्ता म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ.नरेश चंद्र म्हणाले की आज खेळांना अभ्यासक्रमाचा प्रमुख भाग बनवण्याची गरज आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश पाटील यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.

परदेशातील विद्वान ज्यांनी या कार्यक्रमात आपले विचार मांडले त्यामध्ये डॉ लिम बून हुई, सेंटर फॉर स्पोर्ट्स अँड एक्सरसाइज सायन्स, मलेशिया विद्यापीठ, मलेशिया, डॉ. मॅन्डी डेटला, मिंदानाओ स्टेट युनिव्हर्सिटी, फिलिपिन्स, डॉ. एस. सब्बनाथ, जाफना विद्यापीठ, श्रीलंका, इंडोनेशिया, बांगलादेश, व्हिएतनाम आणि जपान सारख्या देशांतील दहा लोकांनी आपले विचार सादर केले.

यासह, भारताच्या विविध राज्यांतील क्रीडा तज्ज्ञ डॉ.नीता बंदोपाध्याय, कल्याणी विद्यापीठ, पश्चिम बंगाल, डॉ.नीलीमा देशपांडे, एनआयएस. पटियाला, डॉ. जान्हवी इच्छापुरीया, आरो विद्यापीठ, गुजरात, डॉ. किरण सुसान चेरियन, I.C.M. आर. हैदराबाद, सुब्रत डे, नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स, मणिपूर, डॉ योगेश कुमार, मेरठ (यूपी), प्रा. वासंती काधीरवन, मुंबई, डॉ. बळवंत सिंह, ठाणे, डॉ. जयवंत माने, खोपोली, डॉ. मनोहर माने, विभाग प्रमुख, शारीरिक शिक्षण विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई, डॉ. भास्कर साळवी, औरंगाबाद, डॉ. घनश्याम ढोकराट, मुंबई, डॉ. किरण मारू, मुंबई इत्यादी लोकांनी आपली मते व्यक्त केली.

या चर्चासत्राचे आयोजक डॉ.हरिश दुबे यांनी सर्व पाहुण्यांचे आभार व्यक्त केले. यज्ञेश्वर बागराव, डॉ दत्ता क्षीरसागर, किरण रायकर, अनिल तिवारी, भरत बागुल, डॉ दिनेश वानुले, मधु शुक्रे आदी प्राध्यापकांची विशेष भूमिका होती.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web