मुंबई/संघर्ष गांगुर्डे – कल्याण नजीकच्या एनआरसी कंपनीतील बेरोजगार कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकार मंत्री रामदास आठवले यांची मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहावर कामगारांच्या शिष्टमंडळाने काही लोकप्रतिनिधींसह भेट घेऊन कामगारांच्या समस्या शासन दरबारी मांडण्याची विनंती केली.या शिष्ठमंडळात कामगार प्रतिनिधी, युनियन पदाधिकारी, भूमी पुत्र कामगार संघर्ष समिती, महिला प्रतिनिधी तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ,ठाणे जिल्हा निबंधक सहकारी संस्था, कामगार आयुक्त ठाणे, पीएफ़चे अधिकारी व इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.
कामगारोच्या वतीने जे. सी. कटारिया, उदय चौधरी, अविनाश नाईक, सुभाष पाटील, माजी नगरसेवक भीमराव डोळस, दासू ठोबरे यांनी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत माहिती दिली. यावेळी रामदास आठवले यांनी या कामगारांचे प्रश्न सोडविण्या संदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन याबाबत अदानी उद्योग समूह यांच्या समवेत संयुक्त बैठक घेऊन न्याय मिळण्याकामी सर्वं प्रकारचे आश्वासन दिले.या बैठकीस माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड, रामदास वळसे, अर्जुन पाटील, सुरेश पाटील, एस बी शुक्ला, संजय वाघमारे, फरीदा पठाण , राजेश त्रिपाठी, मछिंद्र दवचे यांच्यासह अन्य कामगारही उपस्थित होते.