डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – धावत्या रेल्वे गाड्यांवर दगडफेक करण्याच्या घटनांनंतर आता ट्रॅकवरही दगडी ठेवण्याचा प्रकार डोंबिवलीत रेल्वे स्थानकानजीक उघडकीस आला होता. डोंबिवली ते ठाकुर्ली स्थानकांच्या दरम्यान रुळावर काल दगडी ठेवलेल्या आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती .या प्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला .गुप्त बातमीदाराने दिलेली माहिती व तांत्रिक तपास करत या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे .खोडसाळपणाने त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसानी दिली दरम्यान सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या कर्जत लोकल च्या मोटरमन च्या रुळावर दगड ठेवल्याचे लक्षात आले त्यांनी तत्काळ प्रसंगावधान राखत लोकल थांबवत या बाबत रेल्वेला माहिती दिली व हा प्रकार उघडकीस आला
गुरुवारी सायंकाळच्या सुमारास डोंबिवली रेल्वे स्थानकाहून 6 वाजण्याच्या सुमारास कर्जत लोकल कल्याणच्या दिशेने निघाली .डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या काही अंतरावर लोकल पोहचली असता मोटरमनला स्लो डाऊन ट्रॅकवर दगडं ठेवल्याचे लक्षात आले .मोटरमनने प्रसंगावधान राखत गाडी थांबवून याबाबत रेल्वेला माहिती दिली . डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली या ट्रॅकवर ठेवलेले एक मोठ्या आकाराचा, सुमारे 15 लहान दगडी बाजूला केल्या. याप्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करत दगड कोणी ठेवले याचा तपास पोलीस करत होते अखेर खबऱ्यांच्या मार्फत मिळालेल्या माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं असून त्याने खोडसाळ वृत्तीने हा प्रकार केल्याची माहिती पोलिसांनी दिली .तर या प्रकरणी त्याच्या सोबत आणखी कोण होत याच शोध सुरू आहे .