जळगाव/प्रतिनिधी – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल रायगडमध्ये पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज सकाळपासूनच संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असल्याचे दिसत आहेत. त्यातच जळगाव शहरातील वसंत स्मृती भाजपाच्या कार्यालयात कोंबड्या सोडून राणे यांच्या विरोधात ज़ोरदार निदर्शन करण्यात आली. जळगाव शहरातील भाजप कार्यालयासमोर केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वक्तव्याचा निषेध करताना शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. भाजप कार्यालयांमध्ये शिवसैनिकानी घुसण्याचा प्रयत्न करत भाजप शिवसैनिकांमध्ये जोरदार हातापाई झाली असून शिवसेना भाजप कार्यालयात जोरदार राडा झाला.यावेळी शिवसेनेचे गुलाबराव वाघ,महापौर जयश्रीताई महाजन, सुनिल महाजन,गजानन मालपुरे, शिवराज पाटील,शोभा चौधरी , सरीता माळी, राजु चव्हाण,विराज कावडीया,ज्योती शिवदे,प्रशांत सुरळकर,अमित जगताप यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.