संत निरंकारी मिशन द्वारे वननेस-वन परियोजनेचा शुभारंभ करत वृक्षारोपण

कल्याण/प्रतिनिधी – भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संत निरंकारी मिशनद्वारे ‘अर्बन ट्री क्लस्टर’ (नागरी वृक्ष समूह) अभियानाचा शुभारंभ करण्यात आला ‘Oneness-Vann’ (वननेस-वन)  नामक या परियोजनेचा सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शुभहस्ते २१ ऑगस्ट रोजी करण्यात आला. संपूर्ण भारतातील २२ राज्यांच्या २८० शहरांमध्ये निवडक ३५० ठिकाणी या योजनेअंतर्गत सुमारे १,५०,००० रोपांची लागवड करण्यात आली. येत्या काळात या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या महाअभियानाअंतर्गत संत निरंकारी मिशनच्या सेवादार व भाविक-भक्तगणांची महत्वपूर्ण भूमिका असेल. या मोहिमेमध्ये संत निरंकारी मिशन व्यतिरिक्त केंद्र व राज्य सरकार, स्थानिक प्रशासन, शैक्षणिक संस्था व आर.डब्ल्यू.ए. इत्यादीमधील लोकही सहभागी होतील.

    या अभियाना अंतर्गत मिशनच्या डोंबिवली झोनमध्ये दोन ठिकाणी वृक्षारोपण वृक्षारोपण करण्यात आले ज्यामध्ये डोंबिवली पश्चिम येथील रामदास पुंडलिक पाटील उद्यान कल्याण पश्चिम येथील उंबर्डे या ठिकाणांचा समावेश आहे.  मंडळाच्या डोंबिवली झोनचे प्रभारी रावसाहेब हसबे आणि कल्याणचे सेक्टर संयोजक जगन्नाथ म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक सेवादल स्वयंसेवकांनी या अभियानामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले.  याप्रसंगी डोंबिवली येथे स्थानिक नगरसेविका संगीता पाटील, समाजसेवक मुकेश पाटील, पोलीस पाटील भगवान ठाकूर आणि कल्याण महापालिकेचे मुख्य सचिव तथा उद्यान निरीक्षक संजय जाधव, माजी आमदार नरेंद्र पवार, स्थानिक नगरसेवक जयवंत भोईर आदि मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली.  या व्यतिरिक्त मुंबई शहरात तीन ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले ज्यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे यार्डमध्ये १५२० चौ.फू. जागेवर ५०० रोपे लावण्यात आली आहेत. तसेच मरोळ पोलीस परेड मैदान आणि गावदेवी मैदान, घाटला व्हीलेज, चेंबूर येथेही वृक्षारोपण करण्यात आले. 

      या अभियानाचा प्रारंभ करताना सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज म्हणाल्या, “प्राणवायु, जो आम्हाला या वृक्षांपासून प्राप्त होत असतो त्याचे धरतीवर संतुलन ठेवण्यासाठी वनांची निर्मिती करणे आवश्यक आहे. जेवढे अधिक वृक्ष लावू तेवढीच अधिक ऑक्सिजनची निर्मिती होईल आणि तेवढीच शुद्ध हवाही प्राप्त होईल. ज्याप्रमाणे वननेस-वन चे स्वरूप अनेकतेत एकतेचे दृश्य प्रस्तुत करते तद्वत मानवानेही समस्त विसरुन शांतीपूर्ण सह-अस्तित्वाच्या भावनेने एकोप्याने राहून जगाचे सौंदर्य वाढवण्याची गरज आहे. माता सुदीक्षाजी यांनी World Senior Citizen’s Day चा उल्लेख करुन सांगितले की ‘वृक्षांची छाया, वृद्धांची माया’ या उक्तीप्रमाणे जसे ज्येष्ठाचे आशीर्वाद आमच्यासाठी आवश्यक आहेत तद्वत वृक्षदेखील आमच्या जीवनासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत.      वननेस-वन नामक या परियोजने अंतर्गत संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षांचे समूह (Tree Clusters) लावण्यात येतील. त्यांच्या वाढत्या संख्येच्या प्रभावाने आजुबाजूचे वातावरण प्रदूषित होण्यापासून वाचू शकेल आणि स्थानिक तापमान सुद्धा नियंत्रणात राहील. हे वृक्ष स्थानिक जलीवायु आणि भौगोलिक परिस्थितीनुसारच लावण्यात येणार आहेत. संत निरंकारी मिशनचे सेवादार वृक्षांची लागवड केल्यानंतर सतत तीन वर्षे त्यांची देखभाल करतील. त्यामध्ये वृक्षांचे रक्षण, खत व पाण्याची उचित व्यवस्था इत्यादिंचा समावेश आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web