बुलडाणा/प्रतिनिधी – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे प्रत्येक कार्यक्रमांमध्ये येत्या निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा देत आहे अशा वेळेस त्यांची ही भूमिका पक्षाचे आहे का ?असे काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना विचारले असता त्यांनी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, येत्या विधानसभा निवडणुका आम्ही सोबतच लढणार आहोत शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आमची महाविकास आघाडीमधील घटक पक्षांशी ट्युनिंग चांगली आहे असे सांगून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कडून दिल्या जाणाऱ्या स्वबळाचा नाऱ्यावर पूर्णविराम त्यांनी दिला. थोरातांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील अनेक निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलणाऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.ते शनिवारी बुलडाणा जिल्ह्यातील शेगावात पत्रकारांशी बोलत होते. भारतीय जनता पक्षाने जनआशीर्वाद यात्रा काढली आहे. भाजपचे मंत्री राज्यभर फिरत आहेत. मात्र जनतेला महाविकास आघाडीचे काम आवडले आहे. त्यामुळे अशा यात्रांनी काहीच फरक पडणार नसून जनतेचे आशीर्वाद महाविकास आघाडी बरोबर आहे . गंगेचे जे हाल यांनी केलेते ते पाहून त्यांना जनतेने आशीर्वाद का द्यावेत ? असा प्रश्न पडलेला असून महाविकास आघाडीलाच महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद आहे. असा दावा काँग्रेस नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.ते श्री गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त, व्यवस्थापक दिवंगत शिवशंकरभाऊ पाटील यांच्या घरी सांत्वनपर भेटीला शेंगावला आले होते.यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
बैलांच्या शर्यती व्हायला हव्या. बैलबंडी शर्यतीवरील बंदीचा निर्णयाचा केंद्राने फेरविचार करावा. या शर्यतीमुळे ग्रामीण भागात एक उत्साहाचे वातावरण असते. त्या काळातील परिस्थिती पाहून बंदीचा निर्णय झाला असेल, पण आता सरकार तर भाजपची आहे, त्यामुळे त्यांनी बंदीच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी थोरात यांनी यावेळी केली.-केंद्राने बैलबंडी शर्यतीवरील बंदी उठवावी.
रेडीरेकनरवर भाष्य करतांना ना.थोरात यांनी सांगितले कि, अनेक वर्षांपासून रेडीरेकनरचे दर वाढलेले नाहीत. त्यामुळे यंदा हे दर वाढण्याची शक्यता आहे. मात्र ज्या ठिकाणी जमिनीचे दार कमी झालेत त्या ठिकाणीच दर आम्ही कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले.