खा.नवनीत राणा विरुद्ध मानहानीचा दावा ठोकणार – महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर

बुलडाणा/प्रतिनिधी – खासदार नवनीत राणा या नेहमीच वायफळ बोलतात त्यांना त्यांची सवय आहे. असे बोलून आपण त्यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज शनिवारी बुलडाण्यात दिली.ते श्री गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त, व्यवस्थापक दिवंगत शिवशंकरभाऊ पाटील यांच्या घरी सांत्वनपर भेटीला शेंगावला आले होते.यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी जिल्ह्यातील आदिवासी बालकांचे कुपोषण या संदर्भात राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे.यावर बुलडण्याच्या शेगांव दौऱ्यावर आल्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी हे आरोप फेटाळले व खासदार नवनीत राणा विरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची प्रतिक्रिया दिली.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web