समृद्धी महामार्गासाठी लोखंडी सळई भरून घेउन जाणाऱ्या टिप्परला अपघात, १३ मजुर ठार, ३ गंभीर

बुलडाणा/प्रतिनिधी – सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड जवळ समृद्धी महामार्गच्या कामासाठी लोखंडी सळई भरुन मजुरांना घेवून जाणाऱ्या टिप्परवरील चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या भिषण अपघातात 13 मजूरांचा टिप्पर खाली दबून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना आज शुक्रवारी 12 वाजेच्या सुमारास तळेगाव फाट्याजवळ घडली आहे. या अपघातात अन्य 3 मजुरांची प्रकृती चिंताजनक आहे.

समृद्धी महामार्गाच्या कामासाठी तयार करण्यात आलेल्या डेपोतून समृद्धी महामार्गच्या कामासाठी लोखंडी सळई भरुन मजूरांना घेवून जात असतांना सिंदखेडराजा तालुक्यातील तळेगाव जवळील सुरू असलेल्या समृद्धी महामार्गावर एसटी बसला साईड देतांना टिप्परवरचे चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला टिप्पर पलटी झाला. यावेळी टिप्परवर बसलेले 16 मजूर टिप्पर व सळईच्या खाली दबल्याने या अपघातात 8 मजूर जागीच ठार झाले. तर रुग्णालयात उपचारादरम्यान 5 मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. शिवाय 3 मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याने किणगाव राजा, सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर या मजुराची प्रकृती चिंताजनक असल्याने  त्यांना जालना येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी  तात्काळ घटनास्थळी धाव घेत अत्यंत जलदगतीने मदत कार्य सुरू केले व मृतक व जखमींना बाहेर काढण्यात परिश्रम घेतले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक व पोलिसही घटनास्थळावर दाखल झाले होते. दरम्यान या घटनेतील मृतांची ओळखी अद्याप पटली नसून हे मजुर उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती आहे.अपघातानंतर तडेगाव नजीक बघ्यांनी मोठी गर्दी जमली होती. तर मर्गावरील वाहतुकही काही काळासाठी विस्कळीत झाली
होती.

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web