भाजपची जन आशिर्वाद यात्रा ही पेट्रोल-डिझेल २०० रुपये पर्यंत नेण्यासाठी – नाना पटोले

बुलडाणा/प्रतिनिधी – केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळालेल्या राज्यातील चार मंत्र्यांची त्यांच्या विभागातील पाच मतदारसंघात जन आशिर्वाद यात्रा काढण्यात आली आहे.मात्र भाजपची ही जन आशिर्वाद यात्रा ही पेट्रोल-डिझेलला 200 रुपये पर्यंत नेण्यासाठी असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुलडण्यातून केली.

बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव येथे आगामी जिल्हा परिषद,जिल्हा कृषिउत्पन्न बाजार समिती व नगर परिषदेच्या निवडणुकी सदर्भात विजय निर्धार मेळाव्यासाठी ते मंगळवारी रात्री खामगाव येथील कार्यक्रमाला पोहचले होते. त्यावेळी ते भाषणात बोलत होते.एकीकडे 70 रुपये प्रति लिटर आमच्याकडून घेतले जातात.कशासाठी घेतात,काय घेतात त्याचा हिशोब नाही.आपल्याला जो पेट्रोल-डिझेल मिळतो,तो पेट्रोल 30 रुपये आणि डिझेल 22 रुपये प्रति लिटर मिळते. मग पेट्रोल-डिझेल शंभरी पार कशाला केली.आता हे लोक निघालेत जन आशर्वाद यात्रा घेऊन,आपण क्रिकेटचे खेळ पाहतो.संच्युरी झाली की आपण आशिर्वाद देतो.नंतर म्हणतो दुसरी संच्युरी कर,आता यांनी पेट्रोल-डिझेलची संच्युरी केली. हे जन आशिर्वाद यात्रा घेऊन निघाले यांना पेट्रोल-डिझेल 200 रुपये पर्येंत नेण्यासाठी अशी टीका नाना पटोले यांनी केली.

या वेळी काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे,प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोन्द्रे,माजी आमदार दिलीपकुमार सानंदा,माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ,यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी नाना पटोले यांनी भर पावसात मशाल पेटवून कांग्रेसजन यांना शपथ दिली.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web