भिवंडी/प्रतिनिधी – भिवंडी तालुक्यातील वेढे ग्राम पंचायतीला ग्रामीण आवास योजना तालुकास्तरीय सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्कार मिळाला असून शुक्रवारी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी भिवंडी पंचायत समितीचे सभापती रवीकांत पाटील , गट विकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे आदी उपस्थित होते.
वेढे ग्राम पंचायतीने गावात शासनाच्या विविध योजना राबविल्या असून ग्राम पंचायतीने गावात राबविलेल्या लोकोपयोगी कामांची दखल घेत राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ठाणे यांनी घेतली असून तालुका स्तरावर राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण आवास योजनेच्या महा आवास योजना पुरस्कार २०२० – २१ सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत म्हणून वेढे ग्राम पंचायतीला द्वितीय व तृतीय क्रमांकाचे दोन पुरस्कार मिळाले आहेत. वेढे ग्रामपंचायतीने अधिम घरकुल योजना , शबरी घरकुल योजना, रमाई घरकुल योजना अशा विविध घरकुल योजनेत गावात तब्बल ३३ घरकुले बांधली आहेत. तसेच इतर लोकोपयोगी कामे देखील केल्याने ग्राम पंचायतीचा सर्वात्कृष्ट ग्रामपंचायत महाआवास अभियान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भिवंडी पंचायत समितीच्या सभागृहात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले असून वेढे ग्राम पंचायतीचे ग्राम सेवक विलास पाटील व उपसरपंच संजय पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.