कल्याणात गाडी थांबवली म्हणून तरुणाची वाहतूक पोलिसाला दगडाने मारहाण

कल्याण/प्रतिनिधी – नाकाबंदी दरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला थांबवल्याने संतापलेल्या दुचाकीस्वार तरुणाने वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत दगडाने डोक्यात मारहाण केल्याची घटना घडलीये .पोलिसांनी या दुचाकीस्वाराला अटक केली आहे. राहुल रोकडे अस तरुणाच नाव असून या प्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलीस पुढील तपास करत आहेत.

कल्याण पश्चिमेकडील शहाड पुलाजवळ पोलिसांची नाकाबंदी सूरु असून आज सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास वाहतूक पोलीस कर्मचारी प्रकाश पटाईत या ठिकाणी कर्तव्य बजावत होते ,विना हेल्मेट कारवाई सुरू होती यावेळी राहुल  रोकडे हा तरुण भरधाव वेगाने दुचाकी घेऊन जात होता ,पटाईत यांनी त्याची गाडी थांबवली ,मात्र राहुल कट मारत तेथून निघून गेला काही अंतरावर गाडी लावून काही क्षणातच राहुल परत आला ,त्याने पटाईत यांच्याशी हुज्जत घालत त्याच्या डोक्यात दगडाने मारहाण केली .या हल्ल्यात पटाईत जखमी झाले असून त्यांच्यावर रुकिमीनीबाई रुग्णलयात उपचार सुरू आहेत .तर पोलिसांनी राहुल रोकडे याला ताब्यात घेतलं आहे .

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web