जादा व्याजाचे आमिष दाखवून एक कोटी घेऊन पसार झालेला आरोपी गजाआड, डोंबिवलीच्या टिळकनगर पोलिसांची कारवाई

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे- शेअर बाजारात पैसै गुंतवणूक करुन सात ते आठ टक्के दराने व्याज देतो असे आमिष दाखवून अनेकांकडून पैसे घेऊन पसार झालेल्या भामटय़ाला डोंबिवलीच्या टिळकनगर पोलिसांनी यूपीच्या गाजियाबाद येथून अटक केली आहे. चंकेश जैन अस या तरुणाच नाव असून त्याने एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

चंकेश जैन हा तरुण डोंबिवली पूर्व  बालाजी मंदीर रोड  परिसरात राहायचा.चंकेशने अनेक जणांना मी शेयर बाजारात गुंतवनुक करतो तुमचे पैसे शेयर बाजारात गुंतवा मी तुम्हाला सात ते आठ टक्के व्याजाने पैसे परत करतो असे आमिष दाखवले. त्याच्या या जादा व्याजाच्या आमिषाला भुलून अनेक जणांनी चंकेशला पैसे दिले. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने सुरुवातीला काही जणांना मोबदला दिला . अनेक जणांनी त्याच्याकडे गुंतवणूक केली .त्यानंतर मात्र तो अचानक बेपत्ता झाला. चंकेशचा फोन लागत नव्हता त्याने दिलेल्या पत्त्यावर देखील राहत नव्हता त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने गुंतवणूक दारांनी या प्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली .मात्र पोलिसांच्या हातात काहीच सुगावा नव्हता पोलिसांनी चंकेशला शोधण्यासाठी पथके नेमली याच दरम्यान पोलीसांना चंकेशचा मोबाईल नंबर मिळाला याच नंबरच्या आधारे तपास करत उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथे लपून बसलेल्या चंकेशला अटक केली. आत्तार्पयत त्याने एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे  उघड झाले असून त्याने आणखीन किती लोकांना फसविले आहे याचा तपास टिळकनगर पोलिस करीत आहेत.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web