तृतीयपंथीयांनी व्यक्त केली खंत, किमान शासनाने आमच्या लसीकरणाकडे तरी लक्ष्य द्यावे

डोंबिवली/प्रतिनिधी – कोविड ची रुग्ण संख्या कमी होत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठया प्रमाणत लसीकरण होणे गरजेचे आहे.परंतु या लसीकरणात समाजातील तृतीयपंथी आणि वारांगना महिला वंचित राहिलेल्या दिसून येत आहेत. अशा तृतीयपंथी आणि वारांगना डोंबिवली मधील ग्लोबल राईट फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीच्या सहयोगाने आज मोफत लसीकरण ठेवण्यात आलं यावेळेस कल्याण डोंबिवली परिसरातील २०० तृतीयपंथी आणि वारांगना यांना मोफत लसीकरण करण्यात आले. कल्याण डोंबिवली महानगर परिसरात ३५०० हजार तृतीयपंथी असून कोविड काळात सरकार मायबापाने आमच्याकडे हवं तसं लक्ष दिलं नाही आता लसीकरण तरी देईल का मतदानाचा हक्क दिला आम्ही मतदान करतो तरीही आमच्या पर्यंत कोणी पोहोचत नाही अशी खंत व्यक्त करत लवकरात लवकर सरकारने सर्व तृतीयपंथी समाजाला लस द्यावी अशी मागणी केली आहे.

कोणताही समाजगट या आवश्यक सेवांपासून वंचित राहू नये.लसीकरणामुळे या समाजघटकाला सुरक्षितता मिळु शकते. आरोग्यसेवा मिळणे हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. व्यापक पातळीवर समाजापर्यंत पोहोचून लोकांना कोविड-१९ च्याविरोधात आवश्यक ती सुरक्षा बहाल करणे हे आमचे उद्दीष्ट आहे.कोविड-१९ विरोधातील लसीकरण हे सार्वजनिक आरोग्यासमोर उभ्या राहिलेल्या या संकटातून बाहेर येण्यासाठी उचललेले पहिले पाउल आहे.असे रोटरी इंटरनँशनलचे माजी संचालक रो.अशोक महाजन यांनी यावेळी सांगितले.तर डिस्ट्रिक्ट कोवीड १९ टास्क फोर्स प्रमुख डॉ.मोहन चंदावरकर म्हणाले कि, ७० टक्के समाजाचे लसीकरण झाले तरच सुरक्षितता प्राप्त होउ शकते. या उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतपाल डॉ. मयुरेश वारके, रोटरी क्लब आँफ डोंबिवली वेस्टचे अध्यक्ष विरेंद्र पाटील डोंबिवली वेस्टचे सदस्य, रोटरँक्ट क्लब आँफ के.वी.पेंढारकर काँलेज, रोटरी कम्युनिटी काँर्पस आँफ बाले वाकलण, आँप्टीलाईफ यांचे विशेष सहकार्य लाभले.ग्लोबल राईट फाउंडेशनच्या महकदीदी यांनी लसीकरण मोहिम राबविण्यात आल्याबद्दल रोटरीचे आभार मानले. तृतीयपंथींच्या ह्क्क्कासाठी काम करत असलेल्या ग्रोबल राईट फाउंडेशनच्या सदस्या सिद्धी चौधरी म्हणाल्या,मतदान करतो खूप दिवसानंतर लस मिळाली, आम्ही कोणाला दोष देणार देऊन? सरकारने आमच्याकडे समाज दुर्लक्ष करू नये सरकारने असे सांगितले.तर एका वारांगणाने लॉकडून मध्ये सरकारने आमच्याकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप केला.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web