हिंगोली/प्रतिनिधी – दिनांक 06/08/2021 रोजी महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल भगत सिंग कोशियारी यांचा हिंगोली दौरा होता..ते शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आले असता. वंचित बहुजन आघाडी हिंगोली जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व आर्थिक विकास महामंडळाना निधी देण्यासाठी केंद्र व महाराष्ट्र शासनास आपल्या वतीने सूचना देण्यासाठी व विविध आर्थिक महामंडळाच्या योजना सुरु करण्यासाठी सूचना द्याव्यात या संदर्भाने निवेदन सादर करण्यात आले.
महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ,ओबीसी आर्थिक विकास महामंडळ,अपंग आर्थिक विकास महामंडळ,इत्यादी मंडळ मागासवर्गीय व अल्पसंख्यांकांचा आर्थिक विकास व्हावा व त्यांना त्यांचा हक्काचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज रुपी आर्थिक सहकारी मिळावे या हेतूने सुरू करण्यात आली आहेत परंतु गेल्या दहा वर्षांपासून यामहा मंडळांकडून कुठल्याही प्रकारचे ठोस आर्थिक सहकार्य होत असताना दिसत नाही. महामंडळाकडून केवळ बँकांना टारगेट दिले जाते. दिले गेलेले टार्गेट बँका पूर्ण करत नाही. कर्ज देण्यासाठी मालमत्ता तारण ठेवण्यास सांगितले जाते.. मागासवर्गीय समुहाकडे तारण ठेवण्यास काही नसल्याने कर्ज प्रकरणे मंजूर होत नाहीत.
महामंडळामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार दोघांचाही वाटा असलेल्या NSFDC,MSY, महिला समृद्धी, मायक्रो फायनान्स अशा जुना योजना निधीअभावी बंद पडले आहेत त्या योजना आणखी काही योजना सुरू करण्यात याव्यात जेणेकरून सध्या मोठ्या प्रमाणात बेरोजगार असणारा तरुण व महिला यांना रोजगार निर्माण करण्यासाठी आर्थिक सहकार्य मिळेल व सध्या कोरोणाच्या संकटांमुळे देशाची ढासळलेली आर्थिक घडी सुधारण्यास मदत होईल.
आशा प्राकरचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा महासचिव मा.रवींद्र वाढे, जिल्हासचिव ज्योतीपाल रणवीर, शहराध्यक्ष अतिखुर रहेमान,बबन भुक्तर्,विनोद नाईक,रवि शिखरे,अमोल वाढे,प्रल्हाद धाबे,भिमराव धाबे,योगेश नरवाडे,राहुल खिलारे,भीमा सूर्यातल, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.