कल्याण/प्रतिनिधी – शहापूर – कल्याण एसटीतुन प्रवास करणाऱ्या तस्कर प्रजीतीच्या सापाला सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी कल्याण बसस्थानकात पकडुन जीवनदान दिले.धावत्या बसच्या कँबिन मध्ये साप आहे. हे पाहुन प्रसंगावधन राखत चालक आर एस कलाने यांनी वाहक जितू जाधव सह प्रवाशांच्या लक्षात आणून दिले. परंतु तो साप कँबिन च्या पत्र्यामध्ये जाऊन बसल्याचे पाहत चालकांच्या लक्षात आले त्यांनी सह प्रवासी कोनगाव येथील सुनील म्हात्रे यांनी वाहक यांनी प्रवाशांना दिलासा दिल्याने प्रवाशांचा टांगणीला लागलेल्या जीवात धैर्य आले.
सर्पमित्र दत्ता बोंबे यांच्याशी चालकाने भ्रमण ध्वनी वरून संपर्क साधुन साप कँबिनच्या पत्रात्र्यात जाऊन बसल्या बाबत कल्पना दिली सर्पमित्र दता बोंबे यांनी सापाला डिवचु नका तो शांत बसुन राहिल तुम्ही बस घेऊन कल्याण बसस्थानकात या मी तिथे पोहचतो असे सांगत दिलासा दिल्याने प्रवाशांच्या जीव भांड्यात आला. कल्याण बस स्थानकात बस साडे अकार सकाळच्या सुमारास पोहचल्यानंतर एसटी आगारातील त मेकॅनिक ने पत्रा काढून दिल्यानंतर सर्पमित्र दत्ता बोंबे , सर्पमित्र हितेश यांनी सापाला पकडले असता उपस्थितांनी सुटकेचा निश्वास टाकला.
पकडलेला साप चार फुटी लांब असुन तो बिनविषारी तस्कर नावाने ओळखला जाणरा साप होता सापाबाबत बस कर्मचाऱ्यांमध्ये जन जागृती केली.वनपाल एम् डी.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्पमित्र दत्ता बोंबे ,हितेश यांनी पकडलेल्या तस्कर सापाला जीवनदान देत नैसर्गिक अधिवासात सोडले.