भमिपुत्रांनी मोठे आंदोलन केले, ही ताकत पाहूनच खा. कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिपद दिले असावे- उपमहापौर जगदीश गायकवाड

डोंबिवली/प्रतिनिधी – पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड याचा डोंबिवली मध्ये निर्भय जर्नलिस्ट असोसिएशन (रजि) पत्रकार संघाच्या वतीने वार्तालाप ठेवण्यात आला होता.यावेळी त्यांनी शिवसेनेवर आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.नविमुंबईच्या विमानतळाला स्व.लोकनेते दीबा पाटील यांचे नाव का दिले पाहिजे याची माहिती त्यांनी दिली.तसेच भाजप खा.कपिल पाटील हे केंद्रीय मंत्री झाले म्हणून त्याचे अभिनंदन करत सांगितेल की  नविमुंबईला विमानतळ नामकरणासाठी जे भव्य आंदोलन भूमिपुत्रानी केले. ही ताकत पाहूनच भाजपचे खासदार कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिपद दिले असावे असे गायकवाड यांनी सांगितले.

वार्तालापा वेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी उत्तर दिली.हसत-खेळत त्यांनी पत्रकाराशी चर्चा केली.यावेळी आपण कसे निवडून आलो हे त्यांनी सांगितले.भाजप खा.कपिल पाटील हे केंद्रीय मंत्री झाले म्हणून त्याचे अभिनंदन करत सांगितेल की नविमुंबईला विमानतळ नामकरणासाठी जे भव्य आंदोलन भूमिपुत्रानी केले. ही ताकत पाहूनच भाजपचे खासदार कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिपद दिले असावे असे गायकवाड यांनी सांगितले.टोरोंटो बाबती त्यांनी सांगितले की पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे टोरोंटो भूमीपुत्रावर लादला आहे.भूमीपुत्रांनी ठरवले पाहिजे यापुढे आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीला मतदान करणार नाही.हे ठरवले पाहिजे तरच टोरोंटो इकडून जाईल. आमदार राजू पाटील हे आमच्या समाजाचे आमदार आहेत आणि ते पुन्हा निवडून यावे याकरीता मी स्वतःआणि माझ्या कार्यकर्त्याना घेऊन येईल आणि त्यांच्यासाठी प्रचार करेल. येणाऱ्या केडीएमसीमध्ये आम्ही किमान आरपीआयचे पाच नगरसेवक तरी निवडून आणण्याचा प्रयन्त करू. माजी आमदार सुभाष भोईर यांना जर कल्याण ग्रामीण मध्ये तिकीट दिले असते तर ते पन्नास हजार मतांनी निवडून आले असते.मात्र आता बाळासाहेबाची शिवसेना ही आता राहिली नाही,आताची शिवसेना अन्याय कारक आहे.नविमुंबईच्या विमानतळाला स्व.लोकनेते दीबा पाटील यांचे नाव देण्यासाठी आम्ही आमचा लढा चालूच ठेवणार आहोत असेही त्यांनी वार्तालापावेळी सांगितले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web