भिवंडीत पाण्यात अडकलेल्या ४० नागरिकांचे टीडीआरएफच्या टीम कडून सुखरूप स्थळी स्थलांतर

भिवंडी/मिलिंद जाधव – बुधवारी भिवंडी शहरासह ग्रामीण भागात पावसाने दमदार हजेरी लावली होती. दिवसभर कोसळलेल्या पावसाने सायंकाळ नंतर रात्री उशिरा पर्यंत सखल भागात पाणी साचले होते. ग्रामीण भागातील पडघा परिसरातील गणेश नगर येथे मध्यरात्री पावसाचे पाणी साचल्याने याठिकाणी अनेक नागरिक अडकून पडले होते. स्थानिक नागरिकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र पाणी जास्त भरल्याने ठाणे आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत येथील पडघा गणेश नगर भागात अडकलेल्या ४० नागरिकांना सुखरूप स्थळी स्थलांतर केले.

तर याच भागातील सुमारे ५० ते ६० नागरिकांना सतर्कतेचा इशारा असल्याने स्थलांतरित करण्यात आले होते. या नागरिकाची राहण्याची व जेवणाची सोय पडघा ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायत हॉल येथे करण्यात आली होती. तर मनसे जिल्हा अध्यक्ष शैलेश बिडबी, पडघा ग्रामपंचायतिचे सरपंच अमोल बिडबी, उपसरपंच अभिषेक नागावेकर तर सदस्य मदतीसाठी धावून आले होते. पडघा गणेश नगर येथील पाण्यात अडकलेल्या एकूण ४० नागरिकांना मंध्यरात्रीच्या सुमारास टीडीआरएफच्या टीमने सुखरूप बाहेर काढले आहे. असे टीडीआरएफचे वरीष्ठ अधिकारी सचिन डुबे-पाटिल यांनी बोलताना सांगितले.तर याच परिसरातील कुंभारशिव , खैरपाडा येथील पाण्यात अडकलेल्या ३ नागरिकांना एनडीआरएफच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. घटनास्थळी भिवंडीचे तहसीलदार अधिक पाटील , पडघा पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कटके, पडघा मंडळ अधिकारी आगीवले व इतर पोलीस व महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web