कल्याण मध्ये मुकबधीर तरुणीवर अत्याचार करणारा नराधम अखेर गजाआड

कल्याण/ संघर्ष गांगुर्डे – पहाटेच्या सुमारास नोकरीसाठी जाणाऱ्या एकट्या मुकबधीर तरुणीला हेरून तीचा पाठलाग करत  रेल्वेच्या पडीक बंगल्यासमोर तिला पकडून बलात्कार करून पळून जाणाऱ्या नराधमाला अखेर महात्मा फुले पोलिसांनी अथक परिश्रमाने शिताफीने गुजरात मधून अटक केली आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी कर्जत ते सी एसटी परिसर पिंजून काढला होता. तर कल्याण रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही मध्ये  दिसणाऱ्या या आरोपीचा माग काढत त्याला पकडले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे .

अश्विन राठवा असे या नराधमाचे नाव आहे.कल्याण पूर्वेतील परिसरात राहणारी 23 वर्षीय मुकबधीर तरुणी शुक्रवारी 2 जुलै रोजी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास कामावर निघाली होती. तिच्या भावाने तिला कल्याण पूर्वेकडील रेल्वेच्या जिन्या पर्यत सोडल्या नंतर ती रेल्वेचा जिना उतरून रेल्वेच्या पार्किंग जवळील जवळच्या मार्गाने सुभाष चौकाकडे निघाली होती. सुभाष चौकात तिची कंपनीची बस तिला घेण्यासाठी थांबली होती. मात्र या सुमसाम रस्त्यावरून जाणाऱ्या या तरुणीला हेरून त्याने पुढे जात तो रेल्वेच्या पडीक बंगल्यासमोर थांबला ही तरुणी त्याच्या बाजूने जात असताना त्याने तिला पकडून खेचत बंगल्याच्या आत नेत तिच्यावर बलात्कार केला यानंतर तिच्या हातातील फोन खेचून तो  पळून गेला होता. हा नराधम रेल्वेच्या सीसीटीव्हीत कैद झाला होता. या आरोपीचे शेवटचे लोकेशन कळवा झोपड पट्टीत मिळाले होते. तर त्याच्या शोधासाठी पोलिसांनी 5 पथके तयार केली होती. आरोपीचा माग काढत त्याच्यासारख्या दिसणाऱ्या 9 ते 10 लोकांची कसून चौकशी करत त्याचा माग काढला असता मागील 8 ते 10 दिवसापासून तो ठाण्यात राहत असल्याचे समजले. त्याचा शोध घेत असताना तो पोलीसाना गुजरात मधील अहमदाबाद रेल्वे स्थानकावर फिरताना सापडला.  त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्या तरुणीचा चोरलेला मोबाईल देखील हस्तगत केला असून कल्याण न्यायालयाने त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. या आरोपीच्या नावावर आणखी काही गुन्हे आहेत का याचा पोलीस शोध घेत आहेत. 

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web