सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय निवासी शाळेत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या मुलांना मोफत प्रवेश

सोलापूर/अशोक कांबळे – महाराष्ट्र शासनाच्या अभिनव उपक्रमाअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या गुणवत्तेचा विकास व्हावा म्हणून इयत्ता 6 ते 10 (सेमी इंग्लिश) पर्यंतच्या मुलांना निवासी शाळेत मोफत प्रवेश दिला जात आहे.अशी माहिती शासकीय निवासी शाळा नजीक पिंपरी ता.मोहोळ येथील शाळेचे मुख्याध्यापक शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.जास्तीत-जास्त मुलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,या निवासी शाळेत मुलांना डिजिटल क्लास रूमच्या माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे.येथे सुसज्ज ग्रंथालय असून संगणक प्रशिक्षणासाठी स्वतंत्र कक्ष आहे.तसेच ग्रहमंत्रालय भारत सरकार मार्फत स्टुडंट पोलीस कँडेड प्रोग्रॅम राबवण्यात येणार आहे.

या शाळेत राहण्यासाठी वसतिगृहाची सोय आहे.नाश्त्याला दूध,अंडी,फळे,कडधान्य,उपिट, शिरा इत्यादी.दोन वेळेस जेवण,मोफत शाळेचा गणवेश, मोफत तेल,साबण,टूथपेस्ट, ब्रश,शिक्षणासाठी शालेय पुस्तके, वह्या,कंपासपेटी, व इतर शैक्षणिक साहित्य दिले जाणार आहे.तसेच या ठिकाणी सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक तैनात असणार आहेत.

या शाळेत प्रवेश घेण्यासाठी मागील वर्षाची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला,आधारकार्ड, जातीचा दाखला,उत्पन्नाचा दाखला,रहिवासी दाखला,रेशनकार्ड झेरॉक्स,पाच कलर फोटो,बँक पासबुक झेरॉक्स अशी कागदपत्रे फॉर्म सोबत जोडावी.काही अडचण असल्यास शाळेचे मुख्याध्यापक यांनी शिंदे यांनी 9011350908/9923336602 व 7499562844 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web